Spine Clinc

Home क्लिनिक बद्दल

क्लिनिक बद्दल

आमचे मणक्याचे क्लिनिक हे पुणे शहरात आहे. आम्ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव मणक्याचे हॉस्पिटल असलेल्या विनायक हॉस्पिटलमध्ये दररोज ओपीडी घेत असतो.

आम्ही रूबी हॉल क्लिनिक मध्ये सुद्धा रूग्णांचे उपचार करतो. रूबी हॉल क्लिनिक हे पुणे शहरातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे रुग्णालय आहे. डॉ. अवनीश गुप्ते हे रूबी हॉल हॉस्पिटल वानवडी येथील न्यूरो सर्जरीचे संचालक आणि प्रमुख आहेत. हे दोन हॉस्पिटल्स पुणे शहरात जवळच आहेत.

आम्ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ओपीडी घेत आहोत, गैरसोय टाळण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर फोन करा 

020 – 24273698

020 – 24274039

हा एक विशेष फोन नंबर आहे 9890822422 कोणत्याही विशेष मदतीसाठी किंवा काही प्रश्न असल्यास फोन करा…..

आमचे आवाहन

1.  एकमेव हॉस्पिटल जिथे प्रत्येक बेडवर मणक्याचे रुग्ण असतात.
2.  आपले हॉस्पिटल एकमेव हॉस्पिटल आहे जिथे मणक्याची समस्या असलेल्या नवीन पेशंटच्या बाजूला नुकतेच ऑपेरेशन केलेल्या पेशंटचा (उदाहरणार्थ एक दिवसाआधी किंवा दोन दिवसांआधी झालेले आहे )बेड आम्ही ठेवतो जेणेकरून नवीन पेशंटची भीती दूर होईल आणि त्याला प्रोत्साहन मिळेल.
3.  आपले हॉस्पिटल एकमेव हॉस्पिटल आहे जिथे ओपीडीतील नवीन पेशंट नुकतेच ऑपेरेशन केलेल्या पेशंटला चालताना पाहू शकतात.
4. पाठीच्या कणाच्या शस्त्रक्रियेमध्ये १००% यश

Open chat